हाय राधा,
तुला माझं पत्र बघून सुखद धक्का बसला,हे ऐकून मला छान वाटलं आणि हो मला असे धक्के द्यायला आवडतील.चायला पण तुम्ही लोकं मला सोडून मजा करताय ना ....पिक्चर काय नाईटआउट काय......चालायचच....माझी आठवणही येत नाही का रे तुम्हाला शहाण्यांनो....जाऊ दे .मी पण इथे मजाच करतोय आणि करणार आहे.
उद्या आम्ही ट्रेकला जायचा बेत केलाय.५ वाजता निघणारोत घरातून.माझा इथला पहिलाच ट्रेक असेल....मजा येईल अशी आशा आहे.आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी म्हणजे चक्क मी आठवणीने कॅमेरा घेतलाय.त्यामुळे आता स्वत:चे फोटो मी स्वत: अपलोड करेन.आज तयारी करताना तुझी खूप आठवण आली.अरे काय तयारी असायची तुझी सेफ्टी पिनेपासून दोरी,औषधं,खाणे काय नि काय..माझ्या डोळ्यांसमोर आपण केलेला ट्रेक न ट्रेक उभा राहिला.सगळ्यात पहिला ट्रेक म्हणजे....रायगडचा ना??आपण असे चेहेऱ्याने ओळखत होतो एकमेकांना..पण भेट तिथेच झाली होती.मला त्याआधी तू जरा वेडीच वाटलेलीस,२ दिवसांच्या ट्रेकसाठी एवढी औषध वगरे हवीत कशाला!!पण माझा स्वत:चाच पाय वाईट मुरगळला तेव्हा तेच उपयोगी पडल होत.तेव्हापासून जेव्हा आपण भेटतो तेव्हा प्रत्येक वेळी मला तुझ्याबद्दल काहीतरी नवी गोष्ट कळते आणि मग असं वाटत "अरेच्चा!हे माहितीच नव्हत मला!"
मी कालच गांधीहत्या आणि मी वाचायला घेतलाय.प्रभावशाली आहे नक्कीच!आता कोणती मत बरोबर आहेत वगरे नाही सांगू शकत मी आत्ता,पुस्तक पूर्ण झाला की बोलूच.अरे माझी आणखी दोन पुस्तक वाचून झाल्येत ,तू पण वाच-कथा माणसांच्या -लेखक उत्तम कांबळे आणि लाईफ -लुईसे हाय.मस्तच आहेत.खूप असं साहित्यिक वगरे वाटेल पण आयुष्यावर ,जगावर,इथल्या माणसांवर अचूक भाष्य करणारी पुस्तकं वाटली.चर्चा करायची आहे जरा.
आणि एक महत्वाची गोष्ट.मी सहाय्यक लेखक म्हणून काम करतोय .आमच्या कॉलेजात ड्रामासोसायटी आहे ना त्यात मला अभिनायासाठीही निवडलाय पण मी स्क्रिप्ट पण लिहायची म्हणतोय.सध्यातरी सहाय्यकाची भूमिका पार पाडेन.
जुईला माझ्यातर्फे अभिनंदन सांग.मी तिला मेल केल्ये,पण काय आता बाईना वेळ असेल नसेल...तेव्हा तू पण सांग.नाहीतर चिडायची उगाच.तिचा राग कोण ओढवून घेणार!फुकटचा मार पडायचा.तिची निवड झाली हे बेस्टच आहे पण तुला एवढा छाssन वाटण्याच कारण काय? जाऊदे मला फ्रोएड आठवला.असो...जरा वेडंच लागलाय मला.
बाकी काय ठाणे काय म्हणतंय?सगळ्यांना माझ्याकडून शुभ दीपावली सांग.
बाय!
-जय
१९ ऑक्टोबर २०११
ता.क.मला पत्राच्या शेवटीच तारीख लिहायला आवडते .ती गोष्ट पूर्ण झाल्यासारखा वाटतं.दिवाळीत फोन करेन.take care !!मिस यु !!!!
No comments:
Post a Comment