Monday, 17 June 2013

पत्र ५




हाय राधा!!!

मी काही खूप रागावलेलो वगरे नाहीये आणि कदाचित मी ठरवलं  तरी तुझ्यावर रागावू नाही शकणार.. आणि मला सगळ्या रंगांशी प्रोब्लेम नाहीये पण म्हणून गुलाबी???!!?? किती करावं  एखाद्याने !!
आणि काय ग स्वयपाक करता  आल्याबद्दल अभिननदन???आणि  ते पण तू माझ  करत्येस!!! हे एकदम कोण कोणास म्हणालेच आहे बरं  का … तुला येतो तरी का स्वयंपाक करता…उगाचच ४ अनारसे तळले म्हणून काहीही का!!!असो ….

एक चांगली गोष्ट झाली म्हणजे तुमची जर्नल्स तरी पूर्ण करून झाली आता खऱ्या अभ्यासाला सुरुवात!!उगाच टेन्शन आणि त्रास करून घेऊ नका!काम खूप आहे ,वेळ कमी आहे ,पण म्हणून तब्येतीची वाट लाऊन घेण्यात काही राम नाही!

मी आईला पत्र लिहून पोस्ट केल होत. त्यानंतर आईचा २ वेळा फोन येउन गेला पण ती काही म्हणाली नाही आणि आज अचानक पत्र आलं. मला एवढा आश्चर्य वाटल आणि खूप भरूनही आल होतं. तिने पत्रात लिहिला होतं की तिला पत्र वाचून फार आनंद झाला आणि तिला उत्तर लिहितानाही होतोय. तिने लिहिलं  होतं  की," तुला वाईट वाटलं यातच सगळं  आलं. हरकत नाही आणि  माझ्या असा लक्षात आलंय की तू जी चूक करत होतास तीच मीही करत होतेच की!म्हणजे जशी माझी काही मतं आहेत,तशीच तुझीही असणार की . मी तुला एवढंच  सांगेन की तुला जे मनापासून पटतंय आणि योग्य वाटतंय तेच तू कर". मला हे वाचून खूप छान आणि मोकळ वाटल आणि तू म्हणतेस त्याचा पुन:प्रत्यय आला …बोलल्याने गोष्टी एवढ्या सोप्या आणि चांगल्या होऊ शकतात…. आवडलेलचं  आहे । :)

तू मला विचारायच्या आधी तू सांग ,तू काय केलास वालेन्तीन डे च्या दिवशी?मैत्रिणीचा काय सांगत बसतेस ?कोणता वेडा  मुलगा आला होता तुझ्याबरोबर ? मी काहीही केलं नाही.तुल तर माहित्ये मला असा काही आवडत नाही ,उगाच प्रेमाचं  प्रदर्शन कशाला मांडायचं ?म्हणजे काय वर्षातला एकच दिवस लोक प्रेम करतात का?आणि परत काय करायचं  तर  गिफ्टची देवाण घेवाण ,हॉटेलात जाऊन खाणे,बस … हे तर काय वर्षभर चालूच असतं ,नाही का ।एक दिवस काय वेगऴ असणार आहे!!त्यामुळे मी नेहमीप्रमाणे अभ्यास केला,वाचन केलं ,खेळलो,गाणी ऐकली,मंमं आणि गागा!!
   
 मी अजून अर्तिस्त बघितला नहिये.बघितल्यावर  सांगतो ।पण  खूप चांगल ऐकलय त्याच्या बद्दल.पण मी नक्की बघेन आर्तिस्त !!माझी सुधा आता २री  टर्म जवळ आल्ये ,खूप अभ्यास बाकी आहे,म्हणजे मी वेळेत अभ्यास करून सुद्धा!!

आणि काय सांगतेस काय तुला माझी आठवण आली ??धन्य झालो मी!!खरं सांगतोय एकदम मस्त वाटला मला हे ऐकून! मला वाटलं मलाच फक्त तुझी आठवण येते की  काय…म्हणजे मी इथे मी  सगळ्यांना सोडून एकटा  आलोय ,म्हणून मला जास्त आठवण येते ,तुझ्याजवळ बाकीची लोक आहेत ।म्हणजे आपला अख्खा ग्रुप ,पण इथे कोणीच नाहीये न…. पण तुला पण येत्ये म्हणजे हे नॉर्मल आहे,असं मी जाहीर करतो!!!

 तुझ परीक्षेचं वेळापत्रक लागल का ?परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!काका काकूंना  नमस्कार!!

-जय
३ मार्च २०१ २
ता. क. काळजी घे !!काही नाही, एवढंच  सांगायचं  होतं ……………


Wednesday, 16 May 2012

४.१

१५-२-२०१२
हाय जय!!

अगदी मनापासून माफी!!मला वाटलं नव्हत की तू इतका रागावशील....अरे पण मी मजा करत होते न यार!आणि तुही जांभळ्या पेनने लिहिल होतसच की!!! जाऊ दे! आधीच मी खूप दिवसांनी पत्र लिहित्ये..त्यातपण भांडण नको...

स्वयंपाक करता यायला लागल्याबद्दल अभिनंदन..अशीच प्रगती होत राहो!!मला कधी बोलावाणारेस तुझ्या हातच जेवायला?आणि काय रे नाताळात  एकएकट्याने सगळा केक बिक खाल्लास ना ,काही लाज बीज आहे कि नाही!!!! 

परवाच दोन्ही जर्नल्स सबमिट केली..आता जरा हायसं वाटतंय.त्यामुळेच वेळ नाही रे काढता आला असं नीट छान पत्र लिहायला!एप्रिल मध्ये माझी परीक्षा आहे....आपल मत आणि अभ्यासाबद्दल मार्गदर्शन अपेक्षित आहे।

तू काकूला पत्र लिहिणारेस हे वाचून खूप छान वाटलं.आता ठीक आहेस ना?उगाच रडवी गाणी ऐकून रडत नको बसूस हा फार वेळ,पूर वगरे यायचा!! मजेची गोष्ट सोड पण खरच सांगत्ये,तुलाच त्रास होईल मग! पत्र लिहिणारेस न काकूला, ते छान आहेच पण माझं ऐकलस म्हणून जास्त आनंद झाला..आता मला  तुझ रंगीत पेन न वापरण्याबद्दल ऐकण भाग आहे...

काय मग वालेनटाईन  डेला काय केलस विशेष?माझी एक मैत्रीण डेटला गेली होती.किती मस्त ना..अजून तिने सगळ्यांना वृत्तांत सांगितला नाहीये..पण सगळ सविस्तर ऐकवायला लागली ना ती,की कधी कधी असं वाटत की चायला आपल्या आयुष्यात काही थ्रिल्लिंग घडतच नाही यार!! तेच ते कॉलेज,तोच तो अभ्यास आणि लोकांचे प्रोब्लेम्स ऐकून मदत करण..मग ते अगदी प्रेमप्रकरण का असेना..कधी कधी खूप कंटाळा येतो यार!जाऊ दे! तुझ्या डोक्याशी अशी कटकट करून काय होणारे?

मी पण अर्तीस्त बघितला.खूपच मस्त आहे न....सगळा पिक्चरच भारी आहे....काही चूक काढण्यासारख कोणालाच सापडल नसेल..एकदम परफेक्ट!! काही वाचलच नाही रे..या जर्नल्सच्या नादात!!

मी ना या सुट्टीत फोटोग्राफी शिकायच म्हणत्ये!आणि पंचवार्षिक योजना असलेल फ्रोईडचा पुस्तक पण! बघुया काय काय पूर्ण होता ते!तू इथे येणारेस का सुट्टीत?तुला खूप भेटावसं वाटतंय.काल मला तुझी खूप आठवण येत होती..खूप म्हणजे खूप जास्त.....
थांबते इथेच! काळजी घे!काही लागल तर सांग.
-राधा 

Saturday, 24 March 2012

ए राधा ,
ही कसली शिक्षा आहे??गुलाबी शाईने पत्र?????एकदम बाद.....शून्य मार्क......तो रंग काही जीवनात रंग आणत नाहीये...माझा असलेला रस घालवतोय पत्र वाचण्यातला.....प्लीज परत त्या रंगाने पत्र लिहू नको ह मला..मी उत्तर देणार नाही......
खरं तर तुझी माफी मागायची होती..एवढ्या उशिरा उत्तर देतोय म्हणून...पण...ती गुलाबी शाई बघून...असो..

सध्या जरा खूप काम चालू आहे.आत्ताच नाताळची सुट्टी संपले..इथे आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली....भरपूर केक वगरे वगरे...आता परत जोरात कामाला लागला हवं..सगळी मज्जा म्हणजे एक वेगळा पत्रच होईल..पण ते ठीक आहे...नेटवर बोलू शकतो ते! खूप बोलायचंय.मी परवा आरतिस्त बघितला..खूप मस्त सिनेमा आहे.वेळ मिळाला तर जरूर बघ.मला आवडेल चर्चा करायला.

तुझी भेटवस्तूनबद्दलच तत्व मला थोडा थोडा पटलय.पण तरी माझे विचारही मला पटलेलेच  आहेत..अजूनही.मी आईला पत्र लिहिण्याचा प्रयत्न करेन पण जरा कसातरीच वाटतंय..कधी आईला पत्र नाही लिहिलंय मी अजून...तज्ज्ञाची मदत अपेक्षित आहे...मी परवाच सलील कुलकर्णीची अंगाई ऐकली लहान मुलाने आई वडिलांना म्हटलेली!!सांगायला कसातरीच वाटतंय.एक वेगळा अनुभव आला मला.चक्क डोळे पाणावले होते आई-बाबांची आठवण येऊन.असं कधी माझ्या बाबतील होईल असं मला माझ्या उभ्या-आडव्या कुठल्याच आयुष्यात वाटलं नव्हत.

मी फायनली चांगली भाजी आणि खाता येतील इतपत पोळ्या करायला शिकलोय.चांगल वाटतंय नव काहीतरी शिकून.आधी विशेष झेपत नव्हता पण म्हटल,जसं शाळेत असताना नावडीचे विषय जमवले..तसा हेही मला येईल. का नाही येणार...आणि आता जरा बऱ्या झेपतायात..

माझा सल्ला ऐकलास हे ऐकून बर वाटलं.कसा चाललाय अभ्यास?परीक्षा कधी आहे?आत्ताच शुभेच्छा.तुला माहित्ये मी कदाचित विसरुही शकतो.छान अभ्यास कर.अभ्यासावरून आठवलं तुला जोशी सर आवडले किंवा काय ह्यात मला काहीच प्रोब्लेम नाहीये ग!पण मी आपला सांगून ठेवलं...:पण  तुला कोण कोण आवडू शकेल याची मला कल्पना आहे.मोस्टली सगळे असे अभ्यासात वगरे वेडे लोकं...खरं न??त्याच काय आहे..आपल्याकडे जे नसत ना ..तेच लोकांना आवडत......असो.

आणि सध्या काय नवीन बातमी?पुढच्या वर्षीचा काय प्लान आहे?तिथे सगळे कसे आहेत?मला मध्ये मध्ये सगळ्यांची खूपच आठवण येते...आपण जेव्हा जवळ असतो तेव्हा आपल्याला कळत नाही न की आपल्या आजुबाजूची माणस आपल्यासाठी किती महत्वाची असतात ते...मुख्य म्हणजे आपले मित्रमैत्रिणी,घरातली सगळी माणस...त्यांच्यापासून लांब गेल की कळत की आपण घरातला साध गुलाबाच झाडही  आठवून खट्टू होतो......
थांबतो इथेच....काळजी घे..
-जय
५ जानेवारी २०१२
ता.क.मी तुला रागारागात नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला विसरलो..
हैप्पी न्यू इअर!! :)








Monday, 2 January 2012

३.१

१ -१२-२०११

हाय जय,
आज बऱ्याच दिवसांनी पत्र लिहित्ये...म्हटल तू सांगितलेली गोष्ट जरा ऐकून बघू.म्हणून नियमितपणे बाकीची काम करण्याचा प्रयत्न केला खरं,पण मला आवडणारया काही काही गोष्टी जसं की तुला पत्र लिहिण,त्याला वेळच नाही काढला.माफी असावी!!पण ह्या गोष्टीचा खरच उपयोग होतो.सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे मला सकाळी सकाळी परत झोप येत नाही.

मला एक सांग तू कधीपासून रंगीत शाईने लिहायला लागलास??तुला आवडत नसे न काळ्या नाहीतर निळ्या  पेन सोडून बाकीच्या पेनाने लिहिलेल.....आता आवडत वाटतं!!!!मी आता मुद्दाम लिहिलंय रंगीत पेनने.It's like adding colours n life to it!!! पण मला एक सांग हा बदल झाला कसा??काय रे प्रेमात बिमात पडल्यास की काय??

हं प्रेमावरून आठवलं,तू कशाला शिव्या घालातोयास मुलीना??? my reaction regarding Dan Brown was genuine.i love him for his books.काय भारी आहे तो!!आणि काय रे मी  कशाला वेडी आहे?मला पिडण्याचा चंग बांधल्यास का तू?मला खरच जोशी सर आवडतात.हो ते वेडे असले तरीही,विक्षिप्त असले तरीही.पण तुला का त्रास होतोय त्याचा?असो.

ह आता तुझे प्रश्न...भेटवस्तू.......मला एक सांग,तुला जर कोणी गिफ्ट दिली,तर तुला कसा वाटतं???तुझ्या चेहेऱ्यावरचे  भावच सांगतायत की तुला मस्त वाटत.मलाही मस्त वाटतं.आणि मला असं वाटतंय की स्वत:ला मिळालेल गिफ्ट बघून सगळ्यांनाच छान वाटतं,आनंद होतो.थोडक्यात काय तर गिफ्ट्स सगळ्यांना आवडतात मग माणसं आवडो किंवा न आवडो.मला असं वाटत की समोरच्याला आपण आवडतो की नाही,त्याच्याशी पटत का?ती व्यक्ती आपल्याला काय गिफ्ट देणार आहे?किंवा गिफ्ट देणार आहे का?या गोष्टी जरा बाजूला ठेवल्या न....तर आपल्याला गिफ्ट देण्याचा आनंद मिळतो आणि ती घेणाऱ्याला विचित्र वाटत नाहींसा माझा अनुभव आहे.मला तुझ एक म्हणण पटल की आपल्याला ती व्यक्ती जर आवडत नाही तर का गिफ्ट द्यायची!पण आपण जे शिकतो,त्यानुसार प्रत्येक माणूस हा माणूस म्हणून चांगलाच असतो.हं प्रत्येकात वाईट गोष्टी असतात.पण त्या आपल्यातही आहेत.जोपर्यंत त्या व्यक्तीपासून आपल्याला,आपल्या लोक काही त्रास,धोका नाही,तोपर्यंत त्यांच्याशी किमान चांगल वागायला आपला काय जात?कदाचित त्या गिफ्ट देण्यामुळे त्या व्यक्तीचे विचार बदलतील...आपले वाईट विचार चांगले होण्यासाठी मदत होत असेल...तर गिफ्ट का देऊ नये!!आणि मित्रा,काकूना मी निरोप पोहोचवाण्यापेक्षा तूच का नाही सांगत?तिलाही पत्र लिही मस्तपैकी!तिलाही आवडेल.

अरे आणि एक गोष्ट,ते गिफ्ट मागचं अर्थकारण वगरे पटल मलाही.पण गिफ्ट प्रत्येकवेळी काहीतरी महागडी,शोभेची,स्टेटस दाखवणारी वगरे  वस्तूच असावी असं अट्टाहास का?गिफ्ट काहीही असू शकते....विचार कर........

मी परवा एक भयानक पुस्तक वाचल....म्हंजे रत्नाकर मतकरी वगरे नव्हे..... भयानक सत्यस्थिती -"प्लाटफॉर्म नंबर झीरो".अरे तुला आठवत का मी  एफवाय नन्तर "आसरा"नावाच्या संस्थेत जायचे.तिथे रेल्वेस्टेशन वर राहणारी मुलं यायची.त्यांच्याचबद्दल पुस्तक आहे हे.पण मी ऐकल होत त्यापेक्षा भयानक जीवन आहे रे त्यांच....प्रत्येकाचे जीवनानुभव एवढे वेगवेगळे आहेत पण सगळ्याची परिणीती एकचं....स्टेशनवर राहणे.एवढ्या लहान वयात एवढा भावनिक,शारीरिक त्रास,ताण कसा सहन करत असतील रे ही  मुलं!!!आणि आपल्याला आपला ताण खूप जास्त वाटतो...किती विचित्र आहे हे सगळ....एकीकडे श्रीमंताच्या मुलांना पैशाची किंमत कळावी म्हणून रियालिटी शो करतात आपल्याकडे आणि ते तुफान चालतात.आणि दुसरीकडे प्रत्येक पैशा-पैशाची किंमत कळणाऱ्या मुलांकडे कोणाच लक्षही नाहीये.......

इथे सगळे मजेत आहेत.मी अभ्यासाला सुरुवात करत्ये...म्हणजे कस आहे माहित्ये का ,खूप इंटरेस्टींग आहे,  पण अभ्यास करायचा म्हटला की मग जरा कठीण होऊन जात.मला जरा टेन्शन येतं परीक्षेचं.बघूया काय होतं ते!

तुझा नाटक कस चाललाय?लिहून पूर्ण झाला का?कशावर आहे?मला उत्सुकता आहे तू काय लिहिलयस ते वाचण्याची!मला नक्की सांग हं...बाकी काय?तुझा अभ्यास वगरे कसा चाललाय?आता तिथे थंडी असेल न?जाम मज्जा न...मस्त बर्फ वगरे पडत असेल...वाह!क्या बात हे!पण खूपच थंडी वाजत असेल न..काळजी घे!!
बाय!मिस यु!
-राधा








Thursday, 8 December 2011

पत्र ३

Hiii राधा!!!

तू खूपच इम्प्रेस झालेली दिसत्येस !!नाही म्हणजे ते असतीलही खूप छान वगरे.पण एवढी काम एकत्र करणारी व्यक्ती नक्कीच वेडी असणार.......तुला हे आत्ता पटणार नाही,थोड्या दिवसांनी नक्कीच पटेल.
ते जाऊ दे!कशी आहेस तू?कॉलेज कस चाललय?अभ्यास करतेस ना  मधून मधून तरी!! :P
"गांधीहत्या आणि मी"नाही झाल वाचून माझ.सुरुवात वेगात होती पण नन्तर जरा कंटाळाच आला मला.एकसुरी वाटलं ग.अजून अर्धच वाचलय.पण मला एक कळत नाहीये,नथुराम गोडसेंनी गांधीजींचा वध केला (असाच लिहिलंय न) त्याबद्दल फासावारही गेले.आपण इतिहास तर बदलू शकत नाही,मग त्याची एवढी चर्चा कशाला करायची??गांधीजींची आठवण तर त्यांचा आडनाव लावणाऱ्या लोकांनाही नाहीये आणि आपण उगाच आपला वेळ वाया घालवतोय!!!

हं angels and demons मस्तच आहे.पण त्यात लगेच dan brown प्रेम वगरे करण्यासारखा काय आहे त्यात??/तुम्ही मुली पण न चायला......जे समोर दिसतात त्यांन तुम्ही चुकूनही भाव देत नाही आणि जो लेखक भेटण्याची शक्यताही फार कमी आहे अशा माणसावर प्रेम वगरे करत बसता.........

आता जरा मूळ मुद्याकडे वळूया.तुझं पत्र वाचल्यावर मला असं वाटतंय की तुला refreshment ची अतिशय गरज आहे.खूप दिवसात काही वेगळा केला नाहीस का?म्हणजे काहीतरी छंद......संगीत,खेळ आणि महत्वाचा म्हणजे य वर्षांपूर्वी सोडून दिलेला लेखन.तू बहुतेक आजकाल काही लिहीतच नाहीस न (अर्थात ही पत्र सोडून)?आणि जरा पकाव वाटेल पण खरं सांगतोय,PLAN YOUR DAY,LOVE IT AND ENJOY IT!!सारखा दिनक्रम बदलला तरीसुद्धा त्रास होतो.म्हणजे एक दिवस लवकर उठायच,एक दिवस जागायच असं करू नकोस.त्रास होईल तुलाच!(आणि पर्यायाने मलाही).

इथे आता हळूहळू नाताळची तयारी सुरु होत्ये.एकदम दिवाळीसारखा वातावरण आहे.सुट्टीच्या वारी दुकानातली गर्दी,भरपूर सवलती,एकावर एक मोफतच्या  पाट्या,काही विचारू नकोस!!!कधी कधी मला असं वाटत की आपण उगाच खर्च करतो.सगळ तर असत आपल्याकडे.वर्षभर खरेदी चालूच असते.दिवाळीसाठी वेगळ काय घायच आणखी?आणि भेटवस्तूंच म्हणशील,तर काय घ्याव हेही सुचत नाही कधी कधी.सगळच तर असत आपल्याकडे.ना  घेणाऱ्याला अप्रूप ना  देणाऱ्याला!उगाच बाजारात चलन फिरवत रहायचं इकॉनॉमिक मोबिलीटी का काय ते!त्यातही 'अर्थ"शास्त्र आहेच!"ह्याने मला ५०० रुपयाची वस्तू दिली म्हणजे मलापण द्यायलाच हवी."अरे काय आहे हे?वस्तू महत्वाची आहे,तिची किंमत महत्वाची आहे की त्यामागची आपुलकी,प्रेम?उठसूट सगळ्यांना वस्तू देत सुटायच,मग ती व्यक्ती आवडो किंवा न आवडो.ह्याला काय अर्थ आहे? फक्त "लोकं काय म्हणतील"म्हणून भेटवस्तू देण किना घेण मला पटत नाही ग! खोट कशाला वागायच?कालच माझा वाद झाला आईशी.पण तिला काय,कोण आणि कसा सांगणार?शेवटी मीच थांबलो.एकतर बऱ्याच दिवसांनी मला जरा जास्त वेळ होता फोनवर बोलयला,त्यातही वादच घातला.उगाच भांडलो यार मी आईशी!!!मला खूप विचित्र वाटतंय.कधीतरी मी काय वेड्यासारखा वागतो ना .....एकदम विक्षिप्त! माझी जशी वेगळी मत आहेत तशी तिचीही असू शकतात की!एरवी व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने ओरडायच आणि असं वागायच.....किती वाईट न! आई,मी चुकलो,मला माफ कर!!!
अजून काही लिहू शकत नाहीये.थांबतो इथेच.

-जय
१० नोव्हेंबर २०११
ता.क.-take care!!.love  you!

Sunday, 27 November 2011

२.१

३० ऑक्टोबर
Hello जय
कसा आहेस?आता तू तिथल्या वातावरणाला सरावला असशील अशी आशा आहे.पण दिवाळीची लांबलचक सुट्टी नाही ना  या वर्षी!!चालायचच!अरे हो विसरायच्या आधी सांगते,तुझे दिवाळीचे फोटो बघितले.त्यात तू चक्क छान दिसतोयस.हाहाहाह!!
आम्ही सगळ्यांनी दिवाळीत मज्जा केली.यावर्षी मी अनारसे करायला शिकले.मस्त वाटलं नव काहीतरी शिकून.आपण काय फराळ केलात दिवाळीत?तुला तर काही करताच येत नसेल न.....कठीण आहे!!
 "गांधीहत्या आणि मी " वाचून झाल का?मला आवडलं.मी सध्या "Notes to Myself''नावच पुस्तक वाचत्ये.वेगळच आहे रे....जे जे जेव्हा जेव्हा सुचलं ते ते त्यात लिहिलंय.कधी एक ओळ किंवा कधी अख्ख पान.एकदम मनापासून लिहिलेला पुस्तक वाटलं मला.हे आणखी एक माझ Angels and Demons वाचून झाल.जाम भारी आहे रे!!!हातातून सोडवासच वाटत नाही.i just love Dan Brown!!!!
मला न तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे.कधी कधी मला मी काहीच करत नाही असं वाटून खूप उदास वाटत रे.सगळेजण कशात न कशात अडकलेले आहेत.मला जेव्हा वेळ असतो,तेव्हा सगळे मला भेटत नाहीत.मग अजूनच वाईट वाटत.मी काय करत्ये,कशासाठी करत्ये हेच कळत नाही कधी कधी.एकदम अडकल्यासारख,निष्कारण कशात तरी गुंतल्यासारख वाटत .काय कराव तेच कळत नाही.असं झाल न की मग दिवसच वाईट जातो चायला.....धड अभ्यास होत नाही,पुस्तक ,टीव्ही,गाणी कशातच मन लागत नाही.तुला खूप पकवलं तर नाही न???/
सध्या सुट्टी सुरु आहे.त्यामुळे अजूनच रिकामा वेळ आहे. असो!!ए,तुम्हाला जोशी सर् होते का रे??काय भारी आहेत .काय काय करतात ते.जामच भारी.!!!फोटोग्राफी,चित्र,संशोधन आणि बरच काही.तुला माहित्येत ते???म्हणजे त्यांनी शिकवलेल सगळ कळतच असं नाही,पण तरीही ते भारीच आहेत.
तुला पत्र लिहायला लागल्यापासून छान वाटत रे.खूप दिवसात काही लिहिल नाही ना की विचित्र वाटतं एकदम.अरे जाता जाता एक मजा सांगते.मी नवा ब्लॉग लिहायला घेत्ये.बघ वेळ मिळाला तर वाच.तुझ्याशी खरं तर खूप बोलायचय.पण आता थांबते.एकतर फार रात्र झाल्ये आणि हे पत्र मला उद्याच्या उद्या पोस्ट करायचय.म्हणजे ते तुझ्यापर्यंत लवकर पोचेल ना!!
काळजी घे रे बाबा!!आणि हो गिर्यारोहण करताना "आरोहण "करायचं हे ध्यानात असू द्या.थोडा कमी धडपड बर का!!!बाय!!!
miss you!!!
-राधा

Friday, 18 November 2011

पत्र २


हाय राधा,


तुला माझं पत्र बघून सुखद धक्का बसला,हे ऐकून मला छान वाटलं आणि हो मला असे धक्के द्यायला आवडतील.चायला पण तुम्ही लोकं मला सोडून मजा करताय ना ....पिक्चर काय नाईटआउट काय......चालायचच....माझी आठवणही येत नाही का रे तुम्हाला शहाण्यांनो....जाऊ दे .मी  पण इथे मजाच करतोय आणि करणार आहे.
उद्या आम्ही ट्रेकला जायचा बेत केलाय.५ वाजता निघणारोत घरातून.माझा इथला पहिलाच ट्रेक असेल....मजा येईल अशी आशा आहे.आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी म्हणजे चक्क मी आठवणीने कॅमेरा घेतलाय.त्यामुळे आता स्वत:चे फोटो मी स्वत: अपलोड करेन.आज तयारी करताना तुझी खूप आठवण आली.अरे काय तयारी असायची तुझी सेफ्टी पिनेपासून दोरी,औषधं,खाणे काय नि काय..माझ्या डोळ्यांसमोर आपण केलेला ट्रेक न  ट्रेक उभा राहिला.सगळ्यात पहिला ट्रेक म्हणजे....रायगडचा ना??आपण असे चेहेऱ्याने ओळखत होतो एकमेकांना..पण भेट तिथेच झाली होती.मला त्याआधी तू जरा वेडीच वाटलेलीस,२ दिवसांच्या ट्रेकसाठी एवढी औषध वगरे हवीत कशाला!!पण माझा स्वत:चाच पाय वाईट मुरगळला तेव्हा तेच उपयोगी पडल होत.तेव्हापासून जेव्हा आपण भेटतो तेव्हा  प्रत्येक वेळी मला तुझ्याबद्दल  काहीतरी  नवी गोष्ट कळते आणि मग असं वाटत "अरेच्चा!हे माहितीच नव्हत मला!"
मी कालच गांधीहत्या आणि मी वाचायला घेतलाय.प्रभावशाली आहे नक्कीच!आता कोणती मत बरोबर आहेत वगरे नाही सांगू  शकत मी आत्ता,पुस्तक पूर्ण झाला की बोलूच.अरे माझी  आणखी दोन पुस्तक वाचून झाल्येत ,तू पण वाच-कथा माणसांच्या -लेखक उत्तम कांबळे आणि लाईफ -लुईसे हाय.मस्तच आहेत.खूप असं साहित्यिक वगरे वाटेल पण आयुष्यावर ,जगावर,इथल्या माणसांवर अचूक भाष्य करणारी पुस्तकं वाटली.चर्चा करायची आहे जरा.
 आणि एक महत्वाची गोष्ट.मी सहाय्यक लेखक म्हणून काम करतोय .आमच्या कॉलेजात ड्रामासोसायटी आहे ना त्यात मला अभिनायासाठीही  निवडलाय पण मी स्क्रिप्ट पण लिहायची म्हणतोय.सध्यातरी सहाय्यकाची भूमिका पार पाडेन.
जुईला माझ्यातर्फे अभिनंदन सांग.मी तिला मेल केल्ये,पण काय आता बाईना वेळ असेल नसेल...तेव्हा तू पण सांग.नाहीतर चिडायची उगाच.तिचा राग कोण ओढवून घेणार!फुकटचा मार पडायचा.तिची निवड झाली हे बेस्टच आहे पण तुला एवढा छाssन वाटण्याच कारण काय? जाऊदे मला फ्रोएड आठवला.असो...जरा वेडंच लागलाय मला.
बाकी काय ठाणे काय म्हणतंय?सगळ्यांना माझ्याकडून शुभ दीपावली सांग.
बाय!
-जय
१९ ऑक्टोबर २०११
ता.क.मला पत्राच्या शेवटीच तारीख लिहायला आवडते .ती गोष्ट पूर्ण झाल्यासारखा वाटतं.दिवाळीत फोन करेन.take care !!मिस यु !!!!