ए राधा ,
ही कसली शिक्षा आहे??गुलाबी शाईने पत्र?????एकदम बाद.....शून्य मार्क......तो रंग काही जीवनात रंग आणत नाहीये...माझा असलेला रस घालवतोय पत्र वाचण्यातला.....प्लीज परत त्या रंगाने पत्र लिहू नको ह मला..मी उत्तर देणार नाही......
खरं तर तुझी माफी मागायची होती..एवढ्या उशिरा उत्तर देतोय म्हणून...पण...ती गुलाबी शाई बघून...असो..
सध्या जरा खूप काम चालू आहे.आत्ताच नाताळची सुट्टी संपले..इथे आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली....भरपूर केक वगरे वगरे...आता परत जोरात कामाला लागला हवं..सगळी मज्जा म्हणजे एक वेगळा पत्रच होईल..पण ते ठीक आहे...नेटवर बोलू शकतो ते! खूप बोलायचंय.मी परवा आरतिस्त बघितला..खूप मस्त सिनेमा आहे.वेळ मिळाला तर जरूर बघ.मला आवडेल चर्चा करायला.
तुझी भेटवस्तूनबद्दलच तत्व मला थोडा थोडा पटलय.पण तरी माझे विचारही मला पटलेलेच आहेत..अजूनही.मी आईला पत्र लिहिण्याचा प्रयत्न करेन पण जरा कसातरीच वाटतंय..कधी आईला पत्र नाही लिहिलंय मी अजून...तज्ज्ञाची मदत अपेक्षित आहे...मी परवाच सलील कुलकर्णीची अंगाई ऐकली लहान मुलाने आई वडिलांना म्हटलेली!!सांगायला कसातरीच वाटतंय.एक वेगळा अनुभव आला मला.चक्क डोळे पाणावले होते आई-बाबांची आठवण येऊन.असं कधी माझ्या बाबतील होईल असं मला माझ्या उभ्या-आडव्या कुठल्याच आयुष्यात वाटलं नव्हत.
मी फायनली चांगली भाजी आणि खाता येतील इतपत पोळ्या करायला शिकलोय.चांगल वाटतंय नव काहीतरी शिकून.आधी विशेष झेपत नव्हता पण म्हटल,जसं शाळेत असताना नावडीचे विषय जमवले..तसा हेही मला येईल. का नाही येणार...आणि आता जरा बऱ्या झेपतायात..
माझा सल्ला ऐकलास हे ऐकून बर वाटलं.कसा चाललाय अभ्यास?परीक्षा कधी आहे?आत्ताच शुभेच्छा.तुला माहित्ये मी कदाचित विसरुही शकतो.छान अभ्यास कर.अभ्यासावरून आठवलं तुला जोशी सर आवडले किंवा काय ह्यात मला काहीच प्रोब्लेम नाहीये ग!पण मी आपला सांगून ठेवलं...:पण तुला कोण कोण आवडू शकेल याची मला कल्पना आहे.मोस्टली सगळे असे अभ्यासात वगरे वेडे लोकं...खरं न??त्याच काय आहे..आपल्याकडे जे नसत ना ..तेच लोकांना आवडत......असो.
आणि सध्या काय नवीन बातमी?पुढच्या वर्षीचा काय प्लान आहे?तिथे सगळे कसे आहेत?मला मध्ये मध्ये सगळ्यांची खूपच आठवण येते...आपण जेव्हा जवळ असतो तेव्हा आपल्याला कळत नाही न की आपल्या आजुबाजूची माणस आपल्यासाठी किती महत्वाची असतात ते...मुख्य म्हणजे आपले मित्रमैत्रिणी,घरातली सगळी माणस...त्यांच्यापासून लांब गेल की कळत की आपण घरातला साध गुलाबाच झाडही आठवून खट्टू होतो......
थांबतो इथेच....काळजी घे..
-जय
५ जानेवारी २०१२
ता.क.मी तुला रागारागात नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला विसरलो..
हैप्पी न्यू इअर!! :)

No comments:
Post a Comment