१ -१२-२०११
हाय जय,
आज बऱ्याच दिवसांनी पत्र लिहित्ये...म्हटल तू सांगितलेली गोष्ट जरा ऐकून बघू.म्हणून नियमितपणे बाकीची काम करण्याचा प्रयत्न केला खरं,पण मला आवडणारया काही काही गोष्टी जसं की तुला पत्र लिहिण,त्याला वेळच नाही काढला.माफी असावी!!पण ह्या गोष्टीचा खरच उपयोग होतो.सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे मला सकाळी सकाळी परत झोप येत नाही.
मला एक सांग तू कधीपासून रंगीत शाईने लिहायला लागलास??तुला आवडत नसे न काळ्या नाहीतर निळ्या पेन सोडून बाकीच्या पेनाने लिहिलेल.....आता आवडत वाटतं!!!!मी आता मुद्दाम लिहिलंय रंगीत पेनने.It's like adding colours n life to it!!! पण मला एक सांग हा बदल झाला कसा??काय रे प्रेमात बिमात पडल्यास की काय??
हं प्रेमावरून आठवलं,तू कशाला शिव्या घालातोयास मुलीना??? my reaction regarding Dan Brown was genuine.i love him for his books.काय भारी आहे तो!!आणि काय रे मी कशाला वेडी आहे?मला पिडण्याचा चंग बांधल्यास का तू?मला खरच जोशी सर आवडतात.हो ते वेडे असले तरीही,विक्षिप्त असले तरीही.पण तुला का त्रास होतोय त्याचा?असो.
ह आता तुझे प्रश्न...भेटवस्तू.......मला एक सांग,तुला जर कोणी गिफ्ट दिली,तर तुला कसा वाटतं???तुझ्या चेहेऱ्यावरचे भावच सांगतायत की तुला मस्त वाटत.मलाही मस्त वाटतं.आणि मला असं वाटतंय की स्वत:ला मिळालेल गिफ्ट बघून सगळ्यांनाच छान वाटतं,आनंद होतो.थोडक्यात काय तर गिफ्ट्स सगळ्यांना आवडतात मग माणसं आवडो किंवा न आवडो.मला असं वाटत की समोरच्याला आपण आवडतो की नाही,त्याच्याशी पटत का?ती व्यक्ती आपल्याला काय गिफ्ट देणार आहे?किंवा गिफ्ट देणार आहे का?या गोष्टी जरा बाजूला ठेवल्या न....तर आपल्याला गिफ्ट देण्याचा आनंद मिळतो आणि ती घेणाऱ्याला विचित्र वाटत नाहींसा माझा अनुभव आहे.मला तुझ एक म्हणण पटल की आपल्याला ती व्यक्ती जर आवडत नाही तर का गिफ्ट द्यायची!पण आपण जे शिकतो,त्यानुसार प्रत्येक माणूस हा माणूस म्हणून चांगलाच असतो.हं प्रत्येकात वाईट गोष्टी असतात.पण त्या आपल्यातही आहेत.जोपर्यंत त्या व्यक्तीपासून आपल्याला,आपल्या लोक काही त्रास,धोका नाही,तोपर्यंत त्यांच्याशी किमान चांगल वागायला आपला काय जात?कदाचित त्या गिफ्ट देण्यामुळे त्या व्यक्तीचे विचार बदलतील...आपले वाईट विचार चांगले होण्यासाठी मदत होत असेल...तर गिफ्ट का देऊ नये!!आणि मित्रा,काकूना मी निरोप पोहोचवाण्यापेक्षा तूच का नाही सांगत?तिलाही पत्र लिही मस्तपैकी!तिलाही आवडेल.
अरे आणि एक गोष्ट,ते गिफ्ट मागचं अर्थकारण वगरे पटल मलाही.पण गिफ्ट प्रत्येकवेळी काहीतरी महागडी,शोभेची,स्टेटस दाखवणारी वगरे वस्तूच असावी असं अट्टाहास का?गिफ्ट काहीही असू शकते....विचार कर........
मी परवा एक भयानक पुस्तक वाचल....म्हंजे रत्नाकर मतकरी वगरे नव्हे..... भयानक सत्यस्थिती -"प्लाटफॉर्म नंबर झीरो".अरे तुला आठवत का मी एफवाय नन्तर "आसरा"नावाच्या संस्थेत जायचे.तिथे रेल्वेस्टेशन वर राहणारी मुलं यायची.त्यांच्याचबद्दल पुस्तक आहे हे.पण मी ऐकल होत त्यापेक्षा भयानक जीवन आहे रे त्यांच....प्रत्येकाचे जीवनानुभव एवढे वेगवेगळे आहेत पण सगळ्याची परिणीती एकचं....स्टेशनवर राहणे.एवढ्या लहान वयात एवढा भावनिक,शारीरिक त्रास,ताण कसा सहन करत असतील रे ही मुलं!!!आणि आपल्याला आपला ताण खूप जास्त वाटतो...किती विचित्र आहे हे सगळ....एकीकडे श्रीमंताच्या मुलांना पैशाची किंमत कळावी म्हणून रियालिटी शो करतात आपल्याकडे आणि ते तुफान चालतात.आणि दुसरीकडे प्रत्येक पैशा-पैशाची किंमत कळणाऱ्या मुलांकडे कोणाच लक्षही नाहीये.......
इथे सगळे मजेत आहेत.मी अभ्यासाला सुरुवात करत्ये...म्हणजे कस आहे माहित्ये का ,खूप इंटरेस्टींग आहे, पण अभ्यास करायचा म्हटला की मग जरा कठीण होऊन जात.मला जरा टेन्शन येतं परीक्षेचं.बघूया काय होतं ते!
तुझा नाटक कस चाललाय?लिहून पूर्ण झाला का?कशावर आहे?मला उत्सुकता आहे तू काय लिहिलयस ते वाचण्याची!मला नक्की सांग हं...बाकी काय?तुझा अभ्यास वगरे कसा चाललाय?आता तिथे थंडी असेल न?जाम मज्जा न...मस्त बर्फ वगरे पडत असेल...वाह!क्या बात हे!पण खूपच थंडी वाजत असेल न..काळजी घे!!
बाय!मिस यु!
-राधा