Saturday, 5 November 2011

पत्र १

HI राधा!!
इथे अमेरिकेत येऊन १ आठवडा होत आला,हा पहिलाच weekend!आत्ताच freshers partyहून घरी(?)आलोय.बऱ्याच नव्या ओळखी झाल्यात,होत आहेत.नवीन वातावरणाचा अंदाज घेत संभाषण सुरु आहे.४-५ दिवस कोणीच ओळखीच भेटलेल नाहीये त्यामुळे जरा विचित्र वाटतंय.पण त्याचीही सवय होईल अशी आशा आहे.हे विचित्र वाटण मला नीट सांगता येत नाहीये म्हणून असेल कदाचित पण तुझ्याशी बोलावसं वाटलं.मला माहित्ये कि तू हे समजून घेशील नाहीतर एरवी smsला reply द्यायलाही कंटाळणारा मी अचानक पत्र कसा काय लिहितोय याच मलाही आश्चर्य वाटतंय.असो!!
आम्ही सध्या चारजण एकत्र राहतो.त्यातला एक भारतीय आहे.स्वामी.म्हणजे त्याचा नाव  काहीतरी भलामोठ्ठ आहे पण इथे आम्ही सगळे त्याला याच नावाने हक मारतो.या एका आठवड्यातला अनुभव तरी चांगला आहे.एकमेकांचा अंदाज घेणा चालू आहे.स्वामी जाम बडबड करतो.बाकीचे दोघे हळू हळू ओपन होतायत.अरे एक मज्जा-काल माझी जेवण करण्याची पाळी होती.जी काय वाट लागलेली न........चायला आई एवढी वर्ष रोज स्वयपाक कसा करत असेल!!!आणि शिवाय आईचा स्वयपाक दीड-दोन तासात होतो.मला काळ ३ तास लागले.तरी बर मी पोळ्या केल्याच नव्हत्या,कारण त्या मला झेपल्याच नसत्या.भात,आमटी,भाजी आणि कोशिंबीर करून वेळ मारून नेली.इथे जॉन खूप छान स्वयपाक करतो.परवा छान नूडल्स केलेल्या त्याने,त्या तरी छान होत्या!एकंदरीत काय तर इथे बाकी सगळ छान चाललय.ठीक नाहीये तो मीच!!
आयुष्यात पहिल्यांदाच असं रिकाम आणि एकट वाटतंय,तरी इथे काय नाहीये-एकतर अभ्यास आणि कॉलेज,मग घरी आल्यावर मित्र वगरे असतातच,पुस्तक आहेत,३६ GB गाणी आहेत.पण तरीही एकट वाटतंय.घरी २ वेळा फोन करून झाला पण मनाच समाधान होत नाहीये.आणि काय ग शहाणे मी तुलाही फोन करत होतो मगाशी.कुठे जाऊन बसलीस की काय गावात समाजसेवा करायला!!!तुझा न PROFESSIONचुकलय.तू M.Aपेक्षा MSW कर.:P.JOKES APART पण मी तुला आत्ता पत्र लिहायला घेतलय ते याच कारणासाठी!म्हणजे तू प्रवासात,भटकायला,इकडे तिकडे गेलीस तरी तुला हे पत्र नक्की वाचता येईल आणि मलाही!(अर्थात तू लिहिलस तर!)कारण बाकी कोणालाच मी पत्र लिहीत नाहीये.
बाकी तू कशी आहेस?कॉलेज सुरु झाला का?किती वेळ लावणारे तुमची MU?तिथे बाकी सगळे कसे आहेत?काका,काकू,आजी आणि आजोबांना माझा नमस्कार सांग.आता पकावण थांबवतो.रात्रही खूप झाल्ये आणि मुख्य म्हणजे मला अतिशय झोप आल्ये.


-जय
१ ऑक्टोबर २०११.
ता.क.-तुझी पत्र लिहिण्याची IDEA झकास आहे बर का!इतके दिवस फक्त वाचलेल पुस्तकात पण आता खरच छान वाटतंय.THANK YOU!!TAKE CARE!!!!

No comments:

Post a Comment